PCMC : सावधान! पीसीएमसी कॉलनीमधली ‘ही’ इमारत ठरली धोकादायक!

एमपीसी न्यूज़ : निगडी येथील पीसीएमसी कॉलनी येथील (PCMC) इमारत धोकादायक इमारत म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी जाहीर करून येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायला सुचवले आहे. जेणेकरून नागरिकांना सुटकेचा श्वास घेता येईल.

पीसीएमसी कॉलनी येथील इमारत जिना तुटलेल्या अवस्थेत असून शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, यांना जिना चढून जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे पाईपलाईन लिकेज होत आहे. कंपाऊंड भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच, इमारत स्लॅप पावसाळ्यात लिक होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी इमारत स्लॅपच्या ठिकाणी डांबर टाकून तात्पुरता उपाययोजना केल्या होत्या. गेल्या 40 वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी पीसीएमसी कॉलनी येथील इमारतमध्ये वास्तव्य करत आहे. 576 रहिवासी या ठिकाणी रहात असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ही इमारत 40 वर्षांपूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना राहण्यासाठी बांधून दिली होती.

Pune : मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेला गती देण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे – अजय मोरे

सध्या या ठिकाणी नागरिकांना खूप समस्या निर्माण झाल्या असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्वरित (PCMC) दखल घेऊन पी सी एम सीकॉलनी इमारत धोकादायक इमारत म्हणून जाहीर केली.

प्रभागातील नगरसेवक जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन हात झटकून बसले आहे, आणि तसेच लाईट मीटर काढून टाकलेअसून समस्या चा पाढा संपत नाहीये.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ह्या इमारतीतील लोकाना दुसरी कडे स्थलानतर करावे अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तयांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे सचिन काळभोर (सामाजिक कार्यकर्ते) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.