Alandi : डॉ . बी .बी वाफारे यांचा श्रीमती कमला शर्मा शैक्षणिक उत्कृष्टता 2023 पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – माईर्स एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . बी .बी वाफारे (Alandi ) यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल  लेक्सिकोन शैक्षणिक  समूहाकडून  “श्रीमती कमला शर्मा शैक्षणिक उत्कृष्टता 2023 पुरस्कार  शिक्षक दिनाच्या दिवशी  देऊन सन्मानित करण्यात आले” .

सदर पुरस्कार प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाफारे यांना   दिनांक 5 ऑगस्ट  रोजी वितरीत करण्यात आला. या निमित्याने एमआयटी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्या कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. वाफारे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे. गेले 26 वर्षापसून ते या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

Chakan : पॅगो रिक्षा आणि पिकपची धडक; एकजण गंभीर जखमी

त्यांचे प्राथमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या या गावात झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातल्या नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात झाले तर पदव्युत्तर शिक्षण व पीएच डी पुणे विद्यापीठातील गणित विभातून झालेली आहे. त्यांना आतापर्यंत विविध शासकीय व अशासकीय संस्थाकडूंन 19 पुरस्कार मिळालेले आहेत.

त्यांचे संशोधन क्षेत्रातील काम खूप उल्लेखनिय आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध नियतकालिकांमध्ये 113 संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत.  गेले 1999 पासून मायर्स एमआयटी या संस्थेच्या महाविद्यालयात विविध पदांवर कार्यरत आहेत. 2007 पासून एमआयटी कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.याबाबत माहिती राहुल बाराथे (Alandi ) यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.