Alandi : सोळू येथील आग दुर्घटनेत पाचवा मृत्यू

एमपीसी न्यूज – आळंदी जवळ (Alandi) असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून जखमी 17 जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संतोष त्रंबक माने, नवनाथ पांचाळ (वय 55) या दोघांचा घटनेच्या दिवशी मृत्यू झाला. 9 फेब्रुवारी रोजी रामचंद्र मारुती निंबाळकर (वय 81) यांचा तर नंदा संतोष शेळके (वय 35) यांचा 10 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. उपचार सुरु असताना बसवराज बनसोडे (वय 40) यांचा 14 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला आहे.

बेबीताई ठाकूर (वय 70), रणवीर विलास गावडे (वय 3),.चंद्रकांत बबन निंबाळकर (वय 70), मोनू गौतम (वय 25), दिनेश रामकिसन मौर्य (वय 20), दीपक सदाशिव ठाकूर (वय 47), गणेश रामचंद्र कोटंबे (वय 36), श्रुती सोमनाथ ठाकूर (वय 4), विठ्ठल भाऊ ठाकूर (वय 70), निवृत्ती लक्ष्मण ठाकूर (वय 65), मनीषा बबन फुलशेटे (वय 37), नागेश दिलीप ठाकूर (वय 30), उमेश दिलीप ठाकूर (वय 26), शिवांश नागेश ठाकूर (वय 4), अमेंद्र रामविजय पासवान (वय 23), रणजीत हरिश्चंद्र पासवान (वय 19, सर्व रा. सोळू), अब्दुल कलाम खान (वय 50, रा. चिखली) अशी जखमींची नावे आहेत.

Maratha Reservation : अधिसूचना मान्य न केल्यास पुन्हा मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांचे सरकारला आव्हान

8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाची दाहकता खूप असल्याने आजूबाजूच्या घरांना देखील तडे गेले. काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात बांधलेली (Alandi) जनावरे देखील भाजली गेली आहेत. तसेच जनावरांच्या गवताला देखील आग लागली.

सुमारे नऊ दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा स्फोट विद्युत रोहीत्रामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. मात्र रोहित्र सुस्थितीत असून त्यातून होणारा विजपुरवठा बंद होता. तसेच स्फोट झाल्यानंतर कंपनीची भिंत रोहित्रावर बदल्याने रोहीत्राचे खांब वाकले गेले. हा स्फोट रोहीत्रामुळे झाला नसल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले. स्फोट झालेल्या कंपनीत एल्युमिनियम प्लेट बनवल्या जात होत्या. मात्र मागील चार वर्षांपासून कंपनी बंद असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.