Maratha Reservation : अधिसूचना मान्य न केल्यास पुन्हा मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांचे सरकारला आव्हान

एमपीसी न्यूज : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली (Maratha Reservation) सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने दिलेल्या अधिसूचनेचे पालन केले नाही तर मराठा आरक्षणाचे वादळ पुन्हा मुंबईत धडकणार असल्याचे आवाहन आज मनोज जरांगे यांनी केले. 

बुधवारी मनोज जरांगे यांची तब्येत खालवली. सकाळी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता तर दुपारी त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना चालण्याचेही त्राण उरले नसून त्यांचे साथीदार त्यांना पकडून उठवत आहेत. अशातच त्यांचे समर्थक त्यांची तब्येत पाहून चिडल्याचे दिसून येत आहे.

Daund : दौंड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा घसरला टँकर

14 फेब्रुवारीला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.