Daund : दौंड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा घसरला टँकर

एमपीसी न्यूज – दौंड रेल्वे यार्डमध्ये (Daund) प्रवेश करत असताना पेट्रोल वाहतूक करणाऱ्या मालगाडीचा टँकर घसरला. ही घटना बुधवारी (दि. 14) सकाळी पावणे नऊ वाजता घडली.

दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ मनमाड-नगर-दौंड लोहमार्गावरून इंधन वाहतूक करणारी मालगाडी बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास दौंड यार्डमध्ये प्रवेश करत होती. मनमाड जंक्शन जवळील पानेवाडी इंधन डेपो येथून दौंड जंक्शन मार्गे ही मालगाडी मिरजकडे जात होती.

दौंड रेल्वे यार्डात मालगाडी प्रवेश करताना मालगाडीच्या मागील बाजूने तिसऱ्या क्रमांकाचा एक टॅंकर लोहमार्गावरून घसरला. दरम्यान, दौंड-पुणे व दौंड-नगर मेन लाईन खुली असल्याने प्रवासी वाहतुकीवर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही.

Pune : वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले पैसे फेडले नाही म्हणून अल्पवयीन मुलीला लावलं वेश्याव्यवसायाला!

मालगाडीचा टॅंकर घसरल्याची माहिती मिळताच दौंड जंक्शन मधील अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनची विशेष रेल्वे गाडी 140 टन क्षमतेच्या क्रेनसह घटनास्थळी दाखल झाली. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घसरलेल्या (Daund) टॅंकरला लोहमार्गावर ठेवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.