Daund : जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी 10 हजारांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – तक्रारदार यांच्या (Daund) बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी घर जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक केली आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली.

माधव राजाराम रेषेवाड (वय -54 वर्षे , पद -महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, दौंड,वर्ग 3) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Vadgaon Maval : मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांनी मावळ फेस्टिवलची जल्लोषात सांगता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी घर जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी दौंड तहसील येथील लोकसेवक रेषेवाड यांनी तक्रारदार यांना 10 हजार रुपयांची (Daund) लाच मागीतली होती.ही मागणी 9 जानेवारी रोजी केल्या नंतर फिर्यादी यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता रेषेवाड याने घर जप्तीची मुदत वाढवुन देतो म्हणून 10 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारलीअसता रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यावरून आरोपी विरुद्ध दौंड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.