Vadgaon Maval : मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांनी मावळ फेस्टिवलची जल्लोषात सांगता

एमपीसी न्यूज – गायन,नृत्य, हास्य अशा विविध रंगांनी (Vadgaon Maval ) भरलेल्या तीन दिवसीय मावळ फेस्टिवलची जल्लोषात सांगता झाली. कार्यक्रमात प्रसिद्ध गायकांनी सादर केलेल्या धमाकेबाज गाण्यांवर तरुणाई थिरकली. 26 ते 28 जानेवारी या कालावधीत हा फेस्टीव्हल संपन्न झाला. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

डान्स,गाणी व कॉमेडीचा तडका भरलेल्या ‘मावळ जल्लोष 2024’या रंगारंग व धमाल कार्यक्रमाने येथील तीन दिवसीय मावळ फेस्टिव्हलची जल्लोषात सांगता झाली.कार्यक्रमात प्रसिद्ध गायकांनी सादर केलेल्या धमाकेबाज गाण्यांवर तरुणाई थिरकली.मावळ जल्लोष 2024 या कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनेचे मावळ लोकसभा संयोजक व माजी महापौर संजोग वाघेरे व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते झाली.

याप्रसंगी मावळ भाजयुमोचे अध्यक्ष नितीन मराठे,नायब तहसीलदार गणेश तळेकर,माजी सरपंच बाळासाहेब ढोरे,उद्योजक गणेश भेगडे,गणेश कटारिया,दत्तात्रय कुडे,राजेंद्र म्हाळसकर,मावळ फेस्टिव्हलचे संस्थापक प्रवीण चव्हाण,अध्यक्ष सुरेश जांभुळकर,कार्यक्रम प्रमुख विनायक भेगडे,माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे,श्रीधर चव्हाण,योगेश साखरे,शरद मोरे,अनिल ओव्हाळ, सागर थोपटे आदी उपस्थित होते. (Vadgaon Maval)

भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले.मावळ जल्लोष कार्यक्रमात गायिका अक्षया अय्यर हिने गायलेल्या बाई माझी लाडाची,पुरा लंडन घुमाई जा या गाण्यांवर तर गायिका कविता राम हिने गायलेल्या चिमणी उडाली भुर्र,भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या लोकप्रिय गाण्यांवर तरुणाई थिरकली.अभिनेत्री विदिशा म्हसकर व निशाणी बोरुले यांनी बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.विनोदी कलाकार सुहास परांजपे व प्रणव रावराणे यांच्या खुमासदार विनोदांनी प्रेक्षकांना पोटभरून हसवले.

Talegaon Dabhade : रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

कडाक्याच्या थंडीतही या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर,महेंद्र म्हाळसकर,अरुण वाघमारे, विवेक धर्माधिकारी,ॲड पवन भंडारी, सागर जाधव,शैलेंद्र ढोरे,नामदेव ढोरे,नितीन कुडे,रवींद्र
काकडे,भूषण मुथा,श्यामराव ढोरे,किरण म्हाळसकर, शंकर भोंडवे,जितेंद्र कुडे,बाळासाहेब भालेकर,शेखर वहिले,प्रमोद म्हाळसकर,सलीम तांबोळी,दत्तात्रय लंके आदींनी फेस्टिव्हलचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.