Talegaon Dabhade : रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन (Talegaon Dabhade) जवळ रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली.

संजय पांडुरंग घोजगे (वय 36, रा. भगत प्लाझा, यशवंतनगर, तळेगाव स्टेशन. मूळ रा. आंबी, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Dighi : युद्ध स्मारकाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बॉम्बे सॅपर्सचे पॅराड्रॉप प्रदर्शन

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- बेंगलोर उद्यान एक्स्प्रेस (11301) या गाडीच्या धडकेत संजय घोजगे यांचा मृत्यू झाला. ही घटना कातवी उड्डाणपूल येथे घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घोजगे यांचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.