Yerawada : पुण्यातील गुन्हेगारांचा उच्चांक; येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीचे (Yerawada) प्रमाण वाढत असून आता अटक झालेले गुन्हेगार गुन्ह्यासाठी कारागृह देखील सोडत नाहीयेत. रस्त्यावर लोकं सुरक्षित नाहीयेत तर कारागृहातील अधिकाऱ्यांना देखील गुन्हेगारांकडून मारहाण होत आहे. अशीच घटना आज सकाळी येरवडा कारागृहात घडली. कारागृहातील दोन बंद्यानी इतर साथीदारांसह  कारागृहातील अधिकाऱ्यालाच मारहाण केली. 

येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मध्ये ही घटना आज सकाळी घडली. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघेही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनी आज किरकोळ कारणावरून 10 इतर बंद्याना घेऊन शेरखान पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली.

Alandi : सोळू येथील आग दुर्घटनेत पाचवा मृत्यू

पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली (Yerawada) तर उजवा हाथ फ्रॅक्चर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्या बंद्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.