Valentine Day : पुण्यातील 38 जोडप्यांनी साधला ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त

एमपीसी न्यूज – व्हॅलेंटाइन दिनी अनेकजण (Valentine Day) आपल्या प्रेम भावना व्यक्त करत नव्या नात्याला सुरुवात करतात. त्याच धर्तीवर पुण्यातील 38 जोडप्यांनी व्हॅलेंटाइन डे निमित्त लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील 38 जोडप्यांनी बुधवारी (दि. 14) नोंदणी पद्धतीने लग्न केले. कोरोना साथीच्या पूर्वी शेकडो जोडपी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधून नोंदणी पद्धतीने विवाह करत असत. मात्र करोना साथ कालावधीनंतर हे प्रमाण कमी झाले आहे.

Yerawada : पुण्यातील गुन्हेगारांचा उच्चांक; येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण

मागील वर्षी (14 फेब्रुवारी 2023) 44 जोडपी विवाहबद्ध झाली होती. मागील चार वर्षांमध्ये दरवर्षी नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांचा आकडा कमी होत आहे. 14 फेब्रुवारी 2020 रोजी तब्बल 82 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.

अलीकडच्या काळात लग्न समारंभावर वारेमाप खर्च करण्यावर अनेकांचा भर असतो. लग्न म्हणजे ग्रॅंड सेलिब्रेशन. पण दुसरीकडे अशा वारेमाप खर्चाला आळा घालून साधेपणाने लग्न करण्यासाठी देखील काहीजण पुढे येत आहेत. मात्र (Valentine Day) तुलनेत वारेमाप खर्च करणाऱ्या विवाहांची संख्या अधिक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.