Alandi :कार्तिकी यात्रे निमित्त पालिका व पोलीस प्रशासन सज्ज

एमपीसीन्यूज -श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (Alandi )व कार्तिकी यात्रे निमित्त आळंदी नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

प्रशासन ना तर्फे चाकण रोड वारकरी शिक्षण संस्था, इंद्रायणी नगर (हवेली विभाग),जुना पूल इंद्रायणी नदी जवळ(हवेली विभाग),चाकण रोड बाह्यवळण रस्ता अशा विविध ठिकाणी वारकरी भाविकांसाठी स्वच्छता गृहाची सुविधा करण्यात आली आहे.

Mulshi : जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री. निळकंठेश्वर तरुण मंडळाच्या वतीने साखळी उपोषण

तसेच शहरात नगर पालिका चौक, वडगांव चौक,चाकण (Alandi )चौक ,देहूफाटा,वाय जंक्शन,मरकळ चौक अश्या विविध ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारली आहे.तसेच शहरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकर ची सुविधा करण्यात आली आहे.

व माऊली मंदिरात, भैरवनाथ मंदिर लगत,वाय जंक्शन( पोलीस मदत केंद्र लगत) अश्या विविध ठिकाणी आरोग्य मदत केंद्रे उभारली असून तेथे सुविधा देण्याचे कार्य सुरू आहे.

माऊली मंदिर व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आज काहीश्या प्रमाण पायी दिंड्याचे शहरात आगमन झाल्याने शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलीस व पोलीस भाविकां करीता मदत कार्य करताना दिसून येत होते.तसेच वारकरी वाहनांचे शहरात आगमन होत होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.