Bhosari : उद्धट वर्तनाबाबत नोटीस दिल्याने सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात

माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन (Bhosari) केल्याबाबत त्याला नोटीस दिल्याने सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या चक्क कानशिलात लगवण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ई क्षेत्रिय कार्यालयात घडली.

राजेश नंदलाल भाट (वय 54, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर मुरलीधर सोनवणे (वय 32, रा. बोपखेल गावठाण), संतोष लांडगे (वय 45), एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश भाट हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शंकर सोनवणे यास विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती.

Alandi :कार्तिकी यात्रे निमित्त पालिका व पोलीस प्रशासन सज्ज

त्या कारणावरून त्याने इतर साथीदारांना घेऊन येत राजेश भाट (Bhosari) यांना शिवीगाळ केली. मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले. अनोळखी व्यक्तीने भाट यांच्या कानशिलात लगावली.

भाट यांना मारहाण करत त्यांच्या कार्यालयात ओढून नेले. शंकर सोनवणे यांनी तुझ्या नावाने आत्महत्या करून तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली. फिर्यादी शासकीय काम करत असताना आरोपींनी त्यांना अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.