Chikhali : इमारतीच्या अकराव्या मजल्यावर लॉबीला आग

एमपीसी न्यूज – चिखली मधील(Chikhali)इमॅजिका पार्क सोसायटीच्या एका इमारतीमध्ये अकराव्या मजल्यावर लॉबीला आग लागली. यामध्ये साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इमॅजिका पार्क सोसायटीच्या( Chikhali )अकराव्या मजल्यावर लॉबीला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागताच इमारतीमधील नागरिकांनी अकराव्या मजल्यावर सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले. अकराव्या मजल्यावर आठ सदनिका आहेत लॉबीमध्ये ठेवलेले शू रॅक, सायकल, पीओपी, लाईट, सोफा जळून खाक झाला. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

Alandi :कार्तिकी यात्रे निमित्त पालिका व पोलीस प्रशासन सज्ज

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.