Alandi : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारले माऊलींचे जीवन चरित्र

एमपीसी न्यूज – आज दि.27 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माऊली मंदिरात प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी ( Alandi ) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्र सादर केले. त्यामध्ये माऊलींच्या जीवन काळातील विविध प्रसंगाचे उकृष्टरित्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

Chinchwad : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

नेवासा येथे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आशीर्वादाने सच्चिदानंद बाबा यांना संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरील टीका सांगितली व त्यांनी लिहिली. संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताई मांडे भाजणे, संत ज्ञानेश्वर व चांगदेव भेटी वेळी संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत, पंढरपूर येथे पांडुरंगाकडे संजीवन समाधी घेण्याची परवानगी, अलंकापूरी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा इ.विविध प्रसंग मंदिरात सादर करण्यात आले.

यावेळी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या जीवन चरित्राचे कौतुक ( Alandi ) केले.  तसेच आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेकांनी एकमेकांना  सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा  दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.