Chinchwad : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  हटकले या किरकोळ कारणावरून दोघांनी एका तरुणावर ( Chinchwad)  कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. यावरून चिचंवड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, हा सारा प्रकार सोमवारी (दि.26) चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी अरूण काशिनाथ लोकरे (वय 53 रा.वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय जालिंदर टाक (रा. चिंचवड), अविनाश सिताराम गायकवाड (रा. वाकड) यांना अटक केली आहे.यात आकाश अरूण लोकरे (वय 21) हा जखमी झाला आहे.

Maval: मध्यस्ती केली म्हणून एकाला घरात घसून मारहाण, दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारी मुलगी तिच्या बहिणी  व आरोपीसोबत गप्पा मारत बसली होती.  यावेळी आकाश हा कामावरून घरी येत होता. यावेळी त्याने शेजारी राहणाऱ्या मुलीला तु या पोरांसोबत दारु पीत बसली होती का असे विचारले असता त्याचा राग येऊन आरोपींनी त्यांच्या जवळील कोयत्याने व लोखंडी दांड्याने डोक्यात वार करत गंभीर जखमी ( Chinchwad)  केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.