Alandi: गीतेचा प्रचार प्रसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने -संजय मालपाणी

एमपीसी न्यूज – आळंदी येथे प पू. स्वामी गोविंददेव गिरी (Alandi )महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत (चाकण चौक )वारकरी शिक्षण संस्थेसमोर याचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने आज दि.7 रोजी गीता परिवार यांच्या वतीने आळंदी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यात संजय मालपाणी म्हणाले या ठिकाणी प पू स्वामी गोविंदगिरी महाराज (Alandi )यांचा 75 वा जन्मोत्सव गीता भक्ती महोत्सव या नावाने सुरू आहे. अत्यंत प्रगल्भतेने जीवनभर कार्य करणाऱ्या 75 सेवावर्तींचा सन्मान,75 वैदिकांचा सन्मान,75 संतांचा सन्मान,75 देशभक्तांचा सन्मान असे वेगवेगळे सन्मान चालू आहेत. त्यामध्ये आजचा जो दिवस आहे तो स्त्री शक्तीचा दिवस आहे.महिला आपल्या कडे आशा आहेत,ज्या कायमच पडद्या मागे राहतात,आणि काम करत असतात.गीता परिवार ही एक अशी संस्था आहे ,ज्यामध्ये 95 % महिला काम करतात.

कोरोनाच्या वर्षा मध्ये आशु गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ,स्वामीजींच्या आशीर्वादाने प्रेरणेने कार्य केले.घर बसल्या भागवत गीता शिका याचे आयोजन करण्यात आले.भागवत गीता कश्यासाठी शिकायची तर अर्जुनाला तणाव होता,तसं आपले ही होते .नैराशाने ,भयाने आपण ग्रस्त होतो. भागवत गीता या सर्वातून बाहेर काढते.स्वामींजींच्या द्वारे स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून हे 38 वर्ष कार्य सुरूच आहे.

ऑनलाइन कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यात वाढ झाली.186 देशांमधले 8 लाख लोक भागवत गीता शिकत आहे.यामध्ये 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवले जात आहे.पहाटे 5 वाजता बॅच सुरू होते व रात्री 2 वाजता अमेरिकेतील लोकांसाठी बॅच होते.यादरम्यान 2200 झूम क्लासेस रोज होतात.त्या माध्यमातून गीतेचा प्रचार प्रसार सुरू झाले.यामध्ये 8 लाख कार्यकर्ते आहे त्यात बहुतांश महिला कार्यकर्त्या आहेत.आज मुख्यत्वे महिलांचा सन्मान आहे.

हा जो कार्यक्रम चाललेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्म प्रतिष्ठापना व्हावी.धर्माचा जो अर्थ आहे कर्तव्य आहे ,या दृष्टिकोनातून आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भगवत गीतेचे प्राचरण करून रूपांतर केले आणि ज्ञानेश्वरी लिहिली.या गीतेचा प्रचार प्रसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने सुरू आहे.या पवित्र भूमीमध्ये इंद्रायणीच्या तीरावर माऊलींच्या समाधी पाशी यांना बोलवावं त्यांचा सन्मान व्हावा.यादृष्टीकोनातून गीता महोत्सवाचे आयोजन आहे.

अनेक देशातील लोक हा आळंदीतील गीता महोत्सव पाहत आहे.येथील जी कीर्तन परंपरा आहे ,पहिल्यांदा पाहायला भेटली.आपल्या येथे कीर्तनाची श्रेष्ठ परंपरा आहे.ही परंपरा समजली पाहिजे.वारकरी शिक्षण संस्थेतील लहान मोठे येथे किर्तन करतात.येथे हरिपाठ होत आहेत.कीर्तनाचा आनंद ते घेत आहेत.मराठी भाषा समजली नाही तरी टाळ मृदुंगाच्या नादात रममाण होत आहेत.अनेक जण मला म्हणाले त्या नादाने आमच्या मनाला स्पर्श केला.

Tathawade : ताथवडे येथील नवीन अतिउच्च दाब उपकेंद्राला महावितरणची मंजूरी ; 85 हजार वीजग्राहकांना लाभ

गीता परिवाराचे आशू गोयल म्हणाले या महोत्सवात पडद्यामागून ज्या व्यक्ती कार्य करत आहे त्यांचा सन्मान येथे करणार आहोत.देशात महत्व पूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान येथे होणार आहे.आज मातृशक्तीच्या दिवशी त्या मातेंचा सन्मान येथे करणार आहोत.अश्या 13 प्रगल्भतेने काम करणाऱ्या माता शक्तींना येथे आमंत्रित केले आहे.ज्या मातृशक्ती चा सन्मान होणार आहे त्याबाबत त्यांनीं यावेळी माहिती दिली.

गिरीधारी काळे यावेळी म्हणाले वेदशास्त्र संवाद हा असा विषय आहे जो गीता महोत्सवात महत्वाचा घेतला आहे.स्वामिनींच्या निर्देशना नुसार 3 गोष्टींचे वेदांचे कार्य करताना त्यांना साध्य करायच्या होत्या.

त्यात पहिले होते शब्दाचे रक्षण,वेद मुखोद्गत राहिले नसल्याने त्याचे रक्षण होत नव्हते.त्याकरिता पाठशाळा काढल्या गेल्या.आता पर्यंत दोन अडीच हजार विद्वान समाजाला समर्पित केले.

दुसरे अर्थ रक्षण,म्हणजे त्याचे अर्थ कळायला हवे.तिसरा आहे तो सिध्दांत ,वैदिक पद्धतीने जीवन जगायचे कसे ?या तीन उद्देशावर त्यांचे कार्य होते.आता वेद रक्षण झाल्यानंतर त्याचा अर्थ सजवून घेणे.त्याच्याबद्दल चर्चा करणे.तसेच त्यांनी वेद, वेदमंत्र,ग्रहण त्याची उच्चार पध्दती ,त्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.