NCP : शरद पवार गटाचा नव्या नावावर शिक्कामोर्तब; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नवे नामकरण

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे (NCP) गेल्यानंतर शरद पवार गटाकडून नवीन नावाची घोषणा करण्यात आली आहे, निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. अद्याप चिन्ह ठरलेले नसले तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे नाव देण्यात आले आहे. 

अजित पवार गट हाच ‘खरा राष्ट्रवादी’ असल्याचे निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाला त्यांच्या राजकीय जडणघडणीसाठी नवीन नावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह ‘घड्याळ’ देखील दिले आहे.

Alandi: गीतेचा प्रचार प्रसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने -संजय मालपाणी

अजूनही शरद पवार गटाच्या चिन्हावर निर्णय झाला नसला तरीही शरद पवार गट हा (NCP) वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.