Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे एन. एम. एम. एस परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन. एम. एम  एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. (Alandi) इयत्ता 8 वी तील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एकूण 114 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 83 विद्यार्थी पास होऊन प्रशालेचा 72.80% निकाल लागला आहे.

सदर परीक्षेत प्रशालेतील सहा विद्यार्थी यामध्ये भक्ती रविकांत राऊत, सायली अमोल पराये, प्रणव निळोबाराय शिंदे, सुजित विठ्ठल जोरी, गौरव अमोल गीते, अवधूत दत्तात्रय पठारे हे गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिवर्षी 12000 रुपये असे एकूण सहा वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना नारायण पिंगळे, प्रशांत सोनवणे, अमीर शेख, सुदाम मोहरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

Alandi : अंकलीहून माऊलींच्या अश्वांचे 31 मे रोजी प्रस्थान

या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे तसेच संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.