Alandi : अंकलीहून माऊलींच्या अश्वांचे 31 मे रोजी प्रस्थान

एमपीसी न्यूज : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी (Alandi) पालखी सोहळ्या निमित्त दि.31 मे रोजी  माऊलींच्या मानाच्या अश्वांचे श्री क्षेत्र अंकली हुन अलंकापुरी कडे प्रस्थान होणार आहे.

दि.31 मे मिरज,दि.1 जून सांगलवाडी राम मंदिर,दि.2 जून इस्लामपूर पेठनाका,दि.3 जून वहागाव,दि.4 जून रोजी भरतगांव,दि.5जून रोजी भुईज,दि.6 जून रोजी सारोळा,दि.7 जून रोजी शिंदेवाडी,दि.8 व 9 जून रोजी पुणे असे या ठिकाणी रात्रीचे  अश्वांचे मुक्काम असणार आहेत. (Alandi) दि.10जून रोजी अश्वांचे आळंदी मध्ये आगमन होणार आहे.याबाबत माहिती
अश्वचालक व व्यवस्थापक तुकाराम कोळी यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.