Alandi : भागवत एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये भागवत एकादशी निमित्त (Alandi) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी माऊलीं मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

माऊलीं मंदिराच्या गाभाऱ्यात एकादशी निमित्त आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती. तसेच, सिद्धेश्वर मंदिरातील शिवलिंग आकर्षकरित्या पुष्पांनी सजवले होते. भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी देवस्थानच्या वतीने दर्शनबारीवर हिरव्या जाळीचे आच्छादन टाकण्यात आले होते.

Wakad : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचे पथसंचलन

देवस्थान व भाविकांच्या वतीने मंदिरात उपवासाच्या महाप्रसादाचे आयोजन (Alandi) करण्यात आले होते. अनेक भाविकांनी दुपारी त्या महाप्रसादाचा लाभ घेतला. पवित्र इंद्रायणी नदी तीरी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती.

मंदिर परिसरातील दुकाने हार फुलांनी व विविध वस्तू साहित्यांनी सजली होती. मंदिरातील सर्व सुव्यवस्थेवर माऊली वीर यांचे लक्ष होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.