Wakad : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचे पथसंचलन

एमपीसी न्यूज  – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी (Wakad) मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी गुरुवारी (दि. 16) सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या कालावधीत पथसंचलन करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे नगर झोपडपट्टी, कावेरी नगर पोलीस लाईन, म्हातोबा नगर झोपडपट्टी, चौधरी पार्क, काळा खडक झोपडपट्टी, व्हिजन मॉल ताथवडे या मार्गावरून हे पथसंचलन झाले. पथसंचलनात सीआरपीएफचे सात अधिकारी 32 महिला अंमलदार, आरपीएसएफचे तीन अधिकारी 41 अंमलदार, वाकड पोलीस ठाण्यातील आठ अधिकारी 19 अंमलदार असे एकूण 18 अधिकारी आणि 118 अंमलदार तसेच थेरगाव मार्शल, वाकड मार्शल, काळेवाडी मार्शल, रहाटणी मार्शल सहभागी झाले.

Pune News : पेंन्शन विकल्पाकरिता सहा महिन्यांची मुदतवाढ द्या – भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. चिंचवड, सांगवी त्यानंतर वाकड पोलिसांनी देखील पथसंचलन केले.(Wakad) सांगवी पोलिसांच्या पथसंचलनात 123 पोलीस, चिंचवड पोलिसांच्या पथसंचलनात 120 पोलीस, 12 होमगार्ड सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.