Pune News : पेंन्शन विकल्पाकरिता सहा महिन्यांची मुदतवाढ द्या – भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा

एमपीसी न्यूज – विहित नमुन्यातील पत्रव्यवहार करणे व महत्वपूर्ण असल्याने सदरील पर्यायां करिता आवश्यक ते  कागदपत्रे जमा करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ (Pune News) द्यावी अशी मागणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा यांच्या वतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे निवेदन देत करण्यात आली आहे.

या वेळी निवेदनाचा स्विकार मा रिजनल प्राव्हिडंड कमिशनर अमित वशिष्ठ यांनी केला आहे व हे पत्र वरिष्ठ पातळीवर अवलोकना करिता पाठविण्याचे आश्वासन भारतीय मजदूर संघ यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण,  बिडी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश विस्वाद, अण्णा महाजन, महेश डोंगरे, बाळासाहेब पाटील शरद आत्तारकर  शिष्टमंडळ मध्ये उपस्थित होते.

Pune Crime : ॲपद्वारे बुक केलेल्या गाडीतून ‘आयटी’तील महिलेचे अपहरण

निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या  आदेशानुसार पेन्शन बाबतीत पर्याय स्वीकारणे बाबतीत दि 3 मार्च 2023 पर्यंत भविष्या निर्वाह च्या सभासदांना मुदत दिली आहे.  या आदेशाचे सर्व सामान्य कामगारां पर्यंत योग्य माध्यमातून पोहोचले नाहीत, (Pune News) पीफच्या साईटचा बाबतीत कित्येक वेळा समस्या निर्माण होतात,  पी फ कार्यालयाकडून सविस्तर माहिती मिळत नाही पी फ कार्यालयाकडून विहीत नमुन्यातील अर्ज ऊपलब्ध  नाहीत.

साईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध नाही. सध्या कामगारांकडून अर्ज लिहून घेतला जातो. तसेच मा न्यायालयाच्या आदेशाची कामगारांना व व्यवस्थापनाला सविस्तर माहिती देणं आवश्यक आहे.भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला नवीन बदला नुसार 12 महिन्याचा कालावधी वाढून 60 महिने करण्यात आला आहे.

त्यामुळे 1 जून 2014 पुर्वीची पेंन्शन ठरवताना पेंन्शनेबल सॅलरी रू 6 हजार 500 दरमहा तर 1 सप्टेंबर 2014  पासून च्या सेवेसाठी 15 हजार रुपये राहील व पेंन्शन हिश्शाच्या प्रमाणात काढली जाईल.  या बाबतीतचा विकल्प कामगारांना द्यायचा आहे. भविष्य काळात सरकारी धोरणात कोणते बदल होतील ते बदल त्रासदायक का लाभदायक असेल यांचा अंदाज लावणे अवघड आहे. (Pune News)  त्यामुळे भारतीय मजदूर संघाने किमान पेंन्शन दरमहा 5 हजार रुपये व बदलता महागाई भत्ता द्यावा अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.  तरी विकल्पाबाबतीत 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.