Maval News : ‘वापरात नसलेल्या वस्तू, साहित्य वृध्दाश्रमाला दान करा’

सहारा वृध्दाश्रमाचे आवाहन

एमपीसीन्यूज : अडगळीत पडलेली, निरुपयोगी व टाकाऊ वस्तू गरजूंच्या उपयोगी येऊ शकते. त्यामुळे अशा वस्तू आणि साहित्य वृद्धाश्रमाला दान करण्याचे आवाहन मावळ तालुक्यातील सहारा वृध्दाश्रमाच्या वतीने करण्यात आली आहे.

आंदर मावळ येथील कुसवली या गावात सहारा वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात एकूण २२ निराधार वृद्धांचे वास्तव्य आहे. या अनाथ व निराधारांच्या वृद्धाश्रमासाठी वापरात नसलेल्या पण आम्हाला उपयोगी येऊ शकतील, अशा वस्तू दयाव्यात. यामध्ये लोखंडी ट्रंक, भांडयाची मांडणी, कपाट, पाण्याचा ड्रम, धान्य भरून ठेवायची पेटी, कॉट बेड, गाद्या, उशा, ब्लॅंकेट, बेडशीट, पडदे, इलेक्ट्रिक व हार्डवेअरचे सामान, स्वयंपाकासाठी मोठे पातेले, खुर्च्या, फॅन, मिक्सर, कुकर बादली, पाण्याचा पिंप, स्टीलची भांडी, बॅटरी( टाॅर्च), इमर्जन्सी लाईट आदी अशा अनेक प्रकारच्या कोणत्याही वापरण्यायोग्य जुन्या वस्तू दान कराव्यात.

या वस्तू दान करावयाच्या असल्यास 9822042515, 9284739856 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहारा वृद्धाश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.