Theft News: भोसरी येथे दुकानाचे पत्रे उचकटून रोकड चोरली

एमपीसी न्यूज – चोरट्यांनी भोसरी येथील किराणा व स्टेशनरी दुकानाचे पत्रे उचकटून दुकानाच्या ड्रॉवरमधून रोकड चोरीला गेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.12) ते रविवारी (दि.13) या कालावधीत भोसरी येथील बापुजीबुवा चौकातील शिवाय किराणा व स्टेशनरी या दुकानात घडला.

Dehuroad News: वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली अन् शिस्तभगांची कारवाई करा – श्रीजित रमेशन

चंद्रभान जय सिंग (वय 25 रा.चऱ्होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चौरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरीतील बापुजी बुवा चौकात दुकान आहे. ते शनिवारी दुकान बंद करून गेले असता चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश केला.तसेच दुकानातील ड्रॉव्हरमधून 72 हजार रुपये रोख रक्कम व काही वस्तू चोरू नेल्या. याबरोबरच फिर्यादी यांच्या दुकाना शेजारील चप्पलच्या दुकानाचे ही पत्रे उचकटून चोरीचा प्रयत्न केला. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.