Dehuroad News: वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली अन् शिस्तभगांची कारवाई करा – श्रीजित रमेशन

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, ताडी विक्री, देशी दारू, विदेशी दारू, फायर वर्कची अवैध विक्री असे अनेक अवैधधंदे सुरु असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करावी. त्यांच्यावर शिस्तभगांची कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केली आहे.

Woman Molestation : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

याबाबत आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र पाठविले आहे. त्यात रमेशन यांनी म्हटले आहे की, देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करावी. त्यांच्या अधिकारक्षेत्रातील अवैध धंद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. जुगार, ताडी विक्री, देशी दारू, विदेशी दारू, फायरवर्कची अवैध विक्री असे अनेक अवैध धंदे उघडकीस आणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

पण, देहूरोड पोलिसांनी कारवाई केली नाही. मात्र पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने अवैध धंद्यांची माहिती मिळताच निगडी वाकड आणि देहूरोड भागातील अवैध जुगार अड्डे, व्हिडिओ गेम पार्लरवर छापे टाकले. आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे देहूरोडचे पोलीस अधिकारी त्यांच्या आर्थिक हितासाठी या बेकायदेशीर व्यवसायाला कसे समर्थन देतात याचा हा मोठा पुरावा असल्याचेही रमेशन म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.