Dehuroad : अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले साडेपाच लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (Dehuroad )पथकाने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच लाख 40 हजारांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले.

शहजाद आलम अब्बास कुरेशी (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pimpri : विद्यार्थ्यांनी घेतले मानसिक ताण-तणाव व्यवस्थापनाचे धडे

जुना पुणे-मुंबई महामार्गावर एकजण ड्रग्ज विक्रीसाठी आला असल्याची माहिती (Dehuroad )अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच लाख 40 हजारांचे एमडी ड्रग्ज पकडले.

कुरेशी याने मुंबई मधील रिझवान चांदीवाला याच्याकडून हे ड्रग्ज आणले असल्याचे तपासात समोर आले आहे. कुरेशी याची आलिशान कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.