Alandi: ह भ प डॉ नारायण महाराज जाधव यांचा एमआयटी महाविद्यालया कडून मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव

एमपीसी न्यूज – ह भ प डॉ. नारायण जाधव महाराज यांना  महाराष्ट्र  शासना कडून(Alandi) वारकरी संप्रदायाचा अत्यंत मानाचा     ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार देऊन समानीत करण्यात  आले. त्या निमित्त एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाकडून मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव  करण्यात आला.  डॉ. नारायण जाधव  हे महाविद्यालयाच्या  विकास समिती सदस्य आहेत.
तसेच आळंदी सद्गुरु जोग महाराज  वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनी संत साहित्याचा अभ्यास सुरु केला . एकनाथ भागवत . विचारसागर , ज्ञानेश्वरी वृत्तीप्रभाकर ,पंचदशी अशा अनेक  ग्रंथाचा अभ्यास केला आहे. त्यानी वारकरी शिक्षण देणारी संस्था आळंदीत उभी  करून शेकडो कीर्तनकार , प्रवचनकर व साधकांना घडविणाचे काम केले आहे .

Pune : राजेंद्र पवार व उज्ज्वला पवार यांना ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान

माईर्स एमआयटी संस्था हि वारकरी संप्रदायातील   ज्ञानोबा – तुकाराम याचे विचार सर्वत्र प्रसार करण्याचे काम गेली तीस वर्ष अविरत पणे  करीत आहे. तसेच जी संत साहित्याचं प्रचार आणि प्रसार करीत आहेत अशा अतुलनीय व्यक्तीचा सन्मान करणे हि प्राथमिक जबाबदारी समजून  एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ बाळासाहेब वाफारे सातत्याने  ती पार पाडीत आहेत .

संत साहित्याचे  गाढे अभ्यासक डॉ. नारायण जाधव माहाराज यांना मआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाकडून  सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरवन्यात  आले.
या प्रसंगी  संत  ज्ञानेश्वर आद्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ , जुनिअर  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव  कुंभार , महाविद्यालयाचे  कुलसचिव  संदीप रोहिनकर . सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. अर्चना आहेर यांनी केले व सन्मानपत्राचे वाचन डॉ.  शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.  सुरेंद्र हेरकळ यांनी केले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.