Dehuroad : देहूरोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात (Dehuroad)गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून 35 लाख 16 हजार 921 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त केला.

देहूरोड परिसरातील विकासनगर किवळे येथे दांगट पाटील (Dehuroad)यांच्या गोदामात प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्या माहितीवरुन मंगळवारी (दि. 23) विभागाने छापा मारून 23 लाख 68 हजार 580 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

तसेच रियाझ अजीज शेख (रा. देहू मुख्य बाजार, देहू) याच्या घरावर बुधवारी (दि. 24) टाकलेल्या छाप्यात 11 लाख 48 हजार 341 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Chinchwad : मनोज जरांगे यांचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) एन. आर. सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी शीतल घाटोळ, सायली टाव्हरे, अस्मिता गायकवाड, राहूल खंडागळे, बालाजी शिंदे आणि प्रकाश कचवे यांनी केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.