Today’s Horoscope 25 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज :आजचे पंचांग-Today’s Horoscope 25 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – गुरूवार.

तारीख – 25.01.2024.

शुभाशुभ विचार – 11 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – गुरुपुष्यामृत 8.16 नंतर सूर्योदयापर्यंत. शाकंभरी पौर्णिमा.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – पुनर्वसु 8.16 पर्यंत नंतर पुष्य.

चंद्र राशी – कर्क.
—————————–
मेष – ( शुभ रंग – सोनेरी)
मंदावलेल्या व्यापारास चांगली गती येईल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गे लागतील. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही अग्रेसर असाल. प्रेम प्रकरणे डोक्याला मनस्ताप देतील.

वृषभ ( शुभ रंग- निळा)
ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानाला कारणीभूत ठरेल. काही अति हुशार मंडळी आज भेटतील. कमीच बोललेले बरे.

मिथुन – ( शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवला तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठवस आनंदाने कराल.

कर्क – ( शुभ रंग – भगवा)
कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत तुम्ही लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा संभवतो.

सिंह -( शुभ रंग – हिरवा)
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. फक्त स्वार्थाकडे लक्ष असू द्या. परमार्थ आज परवडणार नाही.

कन्या – ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येतील.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करून द्या. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. विरोधकांनाही तुमच्या कामाची पद्धत आता आवडू लागेल.

वृश्चिक ( शुभरंग – राखाडी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. परंतु हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह अजिबात करू नका. संयम ठेवा. ज्येष्ठांना आज उपासनेची प्रचिती येईल.

धनु (शुभ रंग- मोतिया)
आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस आहे. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेही धाडस नको.

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून टाकलेली बरी. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असायला हवी. आज संध्याकाळी जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे.

कुंभ – (शुभ रंग- डाळिंबी)
नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच असेल. पती-पत्नीमधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

मीन ( शुभ रंग- केशरी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.