PCMC : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला दांडी भोवली, 130 कर्मचाऱ्यांना नोटीसा

एमपीसी न्यूज – मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक (PCMC)मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सर्वेक्षण कामाला दांडी मारणाऱ्या 130 कर्मचाऱ्यांना नोटीसा बजाविल्या असून चोवीस तासात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा निलंबन करण्याचा इशारा दिला आहे.

करसंकलन विभागाच्या 16 झोननुसार घरांचे सर्वेक्षण सुरू (PCMC)करण्यात आले आहे. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशी जात असल्यास त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरून घेण्यात येत आहे. एका कर्मचा-यास दिवसाला 50 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे.

आधी टपरी आणि आता ‘वल्ली’; दिग्दर्शक मनोज शिंदे यांनी उलगडली चित्रपट निर्मितीची कथा

त्या कर्मचाऱ्याला सात दिवसांत 400 घरांना भेट द्यावी लागणार आहे. 15 कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक नेमण्यात आला आहे. मंगळवार पासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, विविध तांत्रिक अडचणी सलग दुसऱ्या दिवशीही आल्या.

सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नोडल अधिकारी, पर्यवेक्षक व प्रगणक नेमले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्वेक्षणासाठी 162 पर्यवेक्षक नेमले असून 156 जण प्रशिक्षणाला उपस्थित हाेते. सहा जण गैरहजर हाेते.

तर एक हजार 732 प्रगणक नेमले आहेत. त्यापैकी 130 प्रगणक गैरहजर हाेते. 130 जणांनी प्रशिक्षण घेतले नसून त्यांनी सर्वेक्षणाचे कामही सुरू केले नाही. या सर्व कर्मचा-यांना कारणे दाखवा नाेटीस बजाविण्यात आली आहे. येत्या 24 तासात कामावर रूजू न झाल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा सहायक झाेनल अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.