Babasaheb Purandare Award: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार डॉ. देगलूरकर यांना प्रदान

एमपीसी न्यूज – ‘महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान’, पुणे यांचा पहिला (Babasaheb Purandare Award) “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

 

 

हा कार्यक्राम बालगंधर्व नाट्यमंदीर येथे आयोजित करण्यात आला होता.(Babasaheb Purandare Award) पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्याचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी गायिका उषा मंगेशकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी खासदार प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ प्रसिध्द उद्योजक पुनीत बालन, अमृत पुरंदरे, राधा पुरंदरे आगाशे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिषेक जाधव, ॲड. विशाल सातव आदी उपस्थित होते.

 

Chakan : चाकण येथून 84 हजार रुपयांचा गुटखा जप्त

 

कार्यक्रमात सन्मान सोहळ्यापूर्वी जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन करण्यात आले. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांच्या नावे “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती पुरस्कार-2022” इतिहासाचे अभ्यासक संदीप तिखे यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि अमृत पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

त्याचबरोबर बाबासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या स्नेही गंगाताई पवार यांचादेखील सन्मान करण्यात आला. (Babasaheb Purandare Award) पुढील वर्षीपासून संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्तीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने 11 लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा पुनीत बालन यांच्यावतीने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव अभिषेक जाधव यांनी केले.कार्यक्रमाची सांगता डॉ. प्रसन्न परांजपे यांनी आभार व्यक्त करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.