Hinjawadi Police : चेन स्नॅचींग व मोबाईल चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – महिलांच्या गळ्यातील सोने चोरणारा व मोबाईल चोरणाऱ्या सराईताला हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi police) अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी 29 जुलै रोजी करण्यात आली. आकाश वजीर राठोड (वय 22 रा.मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Babasaheb Purandare Award: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार डॉ. देगलूरकर यांना प्रदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस परिसरात गस्त घालत असताना, त्यांना मारुंजी येथील लक्ष्मी रोड येथे आकाश त्याच्या दुचाकीवरून संशयित रित्या घिरट्या घालताना दिसला. यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता दोन मंगळसूत्र व सात मोबाईल असा एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आकाश याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन तर वाकड व चिखली पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. याचा पुढिल तपास हिंजवडी पोलीस (Hinjawadi police) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.