Baner : रस्त्याचे काम अडवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे बाणेर येथे रसत्याचे काम सुरु होते. यावेळी एका (Baner ) नागरिकाने रस्त्याचे काम अडवले. यावरून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अजित सणस यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.30) फिर्याद दिली असून मधुकर मुसळे (वय 50 रा.औंध) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar : समृध्दी महामार्गावरील अपघातामुळे अजित पवार यांचे आजचे कार्यक्रम रद्द

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील सुस उड्डाणपुलाजवळ रस्ते डांबरीकरणाचे काम सुरु आहे.यावेळी शुक्रवारी (दि.30) मुसळे याने काम आडवून तुम्ही इथे काम करायचे नाही या जागेचा मूळ मालक मी आहे, माझ्या नावावर सातबारा आहे म्हणत डांबरीकरणाचे काम करु दिले नाही. यावरून गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत (Baner )आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.