Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन परिसरात भरदिवसा तीन घरात घरफोडी

एमपीसी न्यूज-  तळेगाव स्टेशन परिसरातील स्वप्ननगरी सोसायटी मध्ये तीन (Talegaon Dabhade) घरात घरफोडी करत तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडण्याचा देखील प्रयत्न केला आहे. हा प्रकार शुक्रवारी(दि.30 जून) सकाळी सहा ते सायंकाळी सात या कालावधीत घडला आहे.

 याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मध फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baner : रस्त्याचे काम अडवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना आरोपीने घराचा कडी कोंडा उचकटून घरातील 13 तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा चार लाख 75 हजार रुपयांचा चोरी केला. तसेच याच सोसायटीमधील  दोन फ्लॅटमध्ये लॉक तोडून 16 हजार रोख व दोन हजार रुपयांचे घड्याळ असा एकूण चोरांनी 4 लाख 93 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहे. तसेच फिर्यादी यांच्या शेजारील बिल्डिंग मधील एका फ्लॅटचे कुलूप तोडण्याचा ही प्रयत्न केला आहे.

हा सर्व प्रकार दिवसा घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या चोरीमुळे सोसायटी यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस (Talegaon Dabhade) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.