Hinjawadi : मक्का येथील विमान तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने साडे सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मक्का हे मुस्लिम बांधवांचे धार्मिक स्थळ (Hinjawadi) आहे. अनेक मुस्लिम बांधव दर्शनासाठी जातात. याच मक्का व अरब देशांचे विमानाचे तिकीट काढून देतो म्हणत एका महिलेची व तिच्या नातेवाईकांची टीबीबल साडे सात लाखांची फसवणूक केली आहे.

हा सारा प्रकार 2 जून 2022 ते आज अखेरपर्यंत हिंजवडी फेज 3 येथे घडला. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.30 जून) फिर्याद दिली असून झाहिद मलिक, अमजद मलिक (दोघे रा. मालाड, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन परिसरात भरदिवसा तीन घरात घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या गोल्डन (Hinjawadi) टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीद्वारे स्वतःचे व नातेवाईकांचे मक्का व सौदी अरब देशांचे विमानाचे जाण्या येण्याचे तिकीट बुकिंग करण्यासाठी साडे सात लाख रुपये दिले.

मात्र, तिकिटांचे बुकिंग न करता फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.