Baramati : बारामतीत विमान कोसळण्याची मालिका सुरुच; आज पुन्हा जुन्या सह्याद्री काऊ फार्मजवळ शिकाऊ विमान कोसळले

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी ( गुरुवार दि. 19 )  बारामतीत (Baramati) विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा शिकाऊ विमान कोसळले आहे. बारामती येथील जुन्या सह्याद्री काऊ फार्मजवळ हे विमान कोसळले आहे. यामध्ये वैमानिक किरकोळ जखमी झाला आहे.

बारामती तालुक्यातील कटफळ येथे एमआयडीसी मधील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे विमान गुरुवारी (दि. 19 ) रोजी दुपारी 3 वाजता कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले होते.

Navratri Festival Special : कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ती…नीलिमाताई वाघुळदे…

ही घटना ताजी असतानाच आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा शिकाऊ (Baramati) विमान कोसळले .यामध्ये वैमानिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.आता कोसळलेले विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गेल्या काही दिवसातील विमान कोसळल्याची ही पाचवी घटना आहे. अचानक विमान कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.विमान कोसळल्याने माणसाचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली (Baramati)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.