Pune : ललित पाटीलला मेफेड्रोनचा फॉर्म्युला देणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – ड्रग्ज तस्कर ललित पाटील, भूषण पाटील यांना मेफेड्रोनचा ( Pune ) फॉर्म्युला देणारा अरविंद लोहारे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Baramati : बारामतीत विमान कोसळण्याची मालिका सुरुच; आज पुन्हा जुन्या सह्याद्री काऊ फार्मजवळ शिकाऊ विमान कोसळले

अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहारे (रा. ओशिवरा, मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अरविंदकुमार लोहारे हा केमिकल इंजिनियर आहे. अरविंद लोहारे हा चाकण येथील ड्रग्ज प्रकरणात 2020 पासून येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

येरवडा जेलमध्ये अरविंद लोहार याची ललित पाटीलशी ओळख झाली. लोहारे हा केमिकल इंजिनीअर असून मेफेड्रोन बनविण्यात माहीर आहे. लोहारे याने ही गोष्ट ललित पाटीलला जेलमध्ये सांगितली. यानंतर लोहारे याने ललित पाटील याला मेफेड्रोन बनविण्याचा फॉर्म्युला  सांगितला.

तसेच अरविंद लोहारे याच्या सांगण्यावरून हरीश पंत याने भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेची भेट घेतली.  शिवाजी शिंदे, राहुल पंडित आणि इतर साथीदारांच्या मदतीने नाशिक येथील शिंदे गावात मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना सुरु केला होता.  याप्रकरणी आतपर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

लोहारे याने अनेकांना मेफेड्रोन बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. मेफेड्रोन कसे तयार करायचे हे शिकवण्यासाठी लोहारे याने ललित पाटीलकडून 35 लाख रुपये घेतले होते. लोहारे याच्यावर नाशिक आणि इगतपुरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हे ( Pune ) दाखल आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.