OTT Platform : ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुम्रपान सेवनाबाबत धोक्याचा इशारा देणे बंधनकारक

एमपीसी न्यूज  ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रास अश्लील भाषा आणि धुम्रपान सेवनाचे चित्रीकरण झालेले ( OTT Platform) आढळून येते. दरम्यान, सरकारने याबाबत तडजोडीचे धोरण स्वीकारल्याचे वृत्त एका वृतसंस्थेने दिले होते. त्यावर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुम्रपान सेवनाने धोका होऊ शकतो, अशा प्रकारचा इशारा देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय आहे, हे लक्षात घेत, केंद्र सरकारने सीओटीपी (COTP) सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ) चित्रपट विषयक नियम, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ही लागू केले ( OTT Platform) आहेत. ओटीटी रूल्स 2023, एक सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.

Baramati : बारामतीत विमान कोसळण्याची मालिका सुरुच; आज पुन्हा जुन्या सह्याद्री काऊ फार्मजवळ शिकाऊ विमान कोसळले

या नियमांतर्गत नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, जिओ सिनेमा, सोनी लिव्ह, ए.एल.टी. बालाजी, वूट अशा सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी आरोग्य केंद्रे, तंबाखूविरोधी आरोग्यविषयक इशारा, स्थिर संदेश स्वरूपात, ठळकपणे आणि नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे तंबाखूच्या वापराच्या दुष्परिणामांवर दृकश्राव्य अस्वीकरण प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.

सरकारच्या ह्या निर्णयाचे, विविध सार्वजनिक आरोग्य संघटनांनी आणि तज्ञांनी स्वागत केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मला तंबाखू नियंत्रण नियमावलीच्या कक्षेत आणून, भारताने तंबाखू नियंत्रण उपाययोजना करण्यात आघाडी घेतली आहे.

हे नियम 1 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले असून सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मनी, या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. यासंदर्भातल्या नियमांशी कोणतीही तडजोड केली जात नाही आणि ओटीटी नियम 2023 चे पालन न केल्यास सरकारकडून ( OTT Platform) कठोर कारवाई केली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.