Navratri Festival Special : कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ती…नीलिमाताई वाघुळदे…

एमपीसी न्यूज – ‘ कुटुंब मीलन ‘ या उपक्रमाला अनेक( Navratri Festival Special) शहरांमध्ये, गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. निश्चित केलेल्या दिवशी चार ते पाच कुटुंबांनी एकत्र यायचं आणि पूर्वनियोजनानुसार एक तास छान कार्यक्रम करायचे, परस्परांशी संवाद साधायचा, खेळ खेळायचे असं याचं स्वरूप असतं.हा उपक्रम यशस्वीरीतीनं चालविणाऱ्या नीलिमाताई वाघुळदे या मैत्रिणीची नवरात्रीच्या निमित्तानं ही ओळख.

नीलिमाताई संवादाचं महत्त्व अस सहजपणे सांगत जातात. पूर्वी एकत्र कुटुंब होती. संवाद सहजसाध्य होता. कुटुंब लहान होऊनही त्यातील संवाद कमी होत चाललायं, असं सांगून कुटुंब मीलन या उपक्रमाचीही माहिती नीलिमाताईंनी सांगायला सुरुवात केली की, ऐकणाऱ्याला तो विचार मनोमन पटतो. काहीतरी करण्याची प्रेरणा देतो.

पंधरा वर्षांपर्यंत मुलांवर जे संस्कार पालक करतात तेच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, असं नीलिमाताई आग्रहानं सांगतात. त्यामुळेच त्यांनी दोन्ही मुलींना सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कारितही केलं आहे. सन 2007 ते 2015 या काळात त्यांनी स्वतःची सॉफ्ट कंपनी देखील यशस्वीरीतीनं चालवली.

ही कंपनी उत्तमरीतीनं चालत होती. हा एक वेगळा अनुभव होता. यश खूप (Navratri Festival Special)  मिळत होतं. पण स्वतःसाठी काही करता येत नव्हतं. समाधान हा महत्त्वाचा पैलू असतो. ते मिळणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे2015 मध्ये कंपनी बंद केली. त्यानंतर खरोखरच योग्य मार्ग गवसला आणि तो मार्ग म्हणजे योगमार्ग.

नंतर नाशिकच्या योग विद्या गुरुकुल मधून योग प्रवीण पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर रामटेकच्या कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठातून एम. ए. योगशास्त्र पूर्ण केलं, असं नीलिमाताई सांगतात.

पुण्यात मारुंजी इथं जे शिवशक्ती संगम हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यानिमित्तानं जी काही तयारी सुरू होती, ती पाहताना अशाप्रकारचं काही काम आपल्यालाही करायला निश्चितच आवडेल, असं त्यांना वाटायला लागलं.

 

त्यातून राष्ट्र सेविका समितीचं काम नीलिमाताईंनी सुरू केलं आणि पुढे सन 2018 पासून त्या कुटुंब प्रबोधनाचं काम करू लागल्या. कुटुंब प्रबोधन हा संघकार्याचा एक आयाम आहे आणि त्या आयामांतर्गत कुटुंब मीलन असं जे काम चालतं त्याच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रमुख म्हणून नीलिमाताई काम करतात.

कुटुंब मीलन हा कार्यक्रम अगदी साधा, सोपा असा आहे. चार ते पाच कुटुंबांनी ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी एकत्र येऊन तासभर वेगवेगळे कार्यक्रम करायचे आणि मुख्य म्हणजे कुटुंबातील सर्वांनी म्हणजे आजी, आजोबा, आई, वडील, घरातील मुलं अशा सगळ्यांनी या कार्यक्रमाला यायचं असं त्याचं स्वरूप असतं.

सुरुवाताला महिन्यातून, नंतर पंधरवड्यातून नंतर सप्ताहात एकदा (Navratri Festival Special)  एकत्र यावं अशी अपेक्षा असते. तासाभराचा कार्यक्रम आखीव रेखीव असतो. सुरुवातीला सांघिक गीत म्हटलं जातं. त्यामुळे सर्वांचा सहभाग कार्यक्रमात होतो.

मग हलके फुलके, गमतीदार खेळ घेतले जातात. त्यातून आनंद मिळतो. नंतर ठरवलेल्या विषयावर साधारण पंचवीस प्रश्नांची प्रश्नमंजुषा होते. त्यामुळे माहितीची देवाण घेवाण होते. मग एखादी छान कथा सांगितली जाते. अशा स्वरूपाचा कार्यक्रम कुटुंब मीलनमध्ये होतो.

नीलिमाताई सांगतात, या कार्यक्रमामुळे संवाद सुरू होतो. चांगले संस्कार होतात. गुणांची वाढ होते. अनेकदा मित्र मित्र किंवा मैत्रिणी ठरवून भेटतात. गप्पा मारतात. पण अशा एकत्र येण्यातून दरवेळी काही चांगला विचार मिळतोच असं नाही.

त्यामुळे कुटुंब मीलन कार्यक्रमातून दरवेळी काही ना काही चांगला विचार मिळेल, अशी योजना आम्ही केलेली आहे. त्याचा खूप फायदा येणाऱ्यांना होतो. असे कुटुंब मीलनांचे कार्यक्रम मोठ्या संख्येनं सुरू होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत.

संवाद साधण्याची प्रक्रिया आणि त्याचं महत्त्व कुटुंब मीलन कार्यक्रमातून नीलिमाताई सातत्यानं सांगतात. चला… आपणही असंच काही तरी छान घडवण्याचा संकल्प (Navratri Festival Special)  करू या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.