Pune : ज्येष्ठ नागरिकाला “कॉल गर्ल” ची भेट पडली महागात; धमकी देत 30 लाख रुपयांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज – 74  वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला “कॉल गर्ल” ची भेट चांगलीच ( Pune) महागात पडली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत एका महिलेने या ज्येष्ठ नागरिकाकडून 3 महिन्यात  30 लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी 74 वर्षीय व्यक्तीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune : मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही-राज ठाकरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जुलैमध्ये  एका महिलेमार्फत एका ‘कॉल गर्ल’ची भेट घेतली होती. त्यानंतर फिर्यादी यांना त्या महिलेचा फोन आला. पोलिसांनी “तुम्ही भेटलेल्या त्या कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलीय. तिच्या मोबाईल मध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे, अशी महिलेने बतावणी केली. पोलिस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती दाखवून हा विषय संपवण्यासाठी पैश्यांची मागणी केली.

आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी 30 लाख 30 हजार रुपये दिले. परंतु आरोपींचे दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी दिली अखेर सततच्या त्रासाला कंटाळून  ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत ( Pune) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.