Pune : मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही-राज ठाकरे

एमपीसी न्यूज –  मुंबईतील रस्ते बांधून बाहेरच्यांसाठी (Pune) सोय करताना तिथल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. पुणे शहरात हाच प्रकार अवलंबिला जात आहे.आज पुणे कुठे राहिलंय? इथे पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीकडचं पुणे वेगळं, इकडचं पुणे वेगळं, नदीकाठचं पुणे वेगळं, विमाननगरचं पुणे वेगळं. कुणाचा कशाला काही संबंधच उरलेला नाहीये. पुणे म्हणून कुठे काही राहिलंय? याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आहे .मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही ,  अशा शब्दांत राज ठाकरेंनी पुण्यातील परिस्थितीवर टीका केली.

Chinchwad : आयटीनगरी हिंजवडीत गेल्यावर अमेरिकेला आल्यासारखे वाटते – शरद पवार

‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर’तर्फे जागतिक वास्तूविशारद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरे बोलत होते.

बेसुमार बांधकामामुळे मुंबई-पुण्यात प्रदूषणाचं प्रमाण वाढले (Pune) आहे. सत्ताधाऱ्यांची दृष्टी असेल, तर शहराच्या नियोजनात ती प्रतिबिंबित होते. बेसुमार बांधकाम. मुंबईत कोस्टल रोड, उड्डाणपूल, र.स्ते, इमारती बांधल्या जात आहेत. हे रस्ते कुणासाठी बांधले जात आहेत? ही मुंबई शहर वा उपनगरात राहणाऱ्या लोकांनी ही लोकसंख्या वाढवलेली नाही.

बाहेरून येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी तुम्ही तिथे राहणाऱ्या लोकांच्या सर्व सोयी घालवून बसताय” असे सांगत राज्याबाहेरून येणाऱ्या लोंढ्यांच्या मुद्द्यावरून  राज ठाकरे यांनी  सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

कोणत्याही शहराच्या लोकसंख्येच्या 15 टक्के अंतराचे रस्ते शहरात अपेक्षित असतात. पुण्यात हे प्रमाण केवळ सात ते आठ टक्क्यांएवढे आहे. यामुळे भविष्यात पुण्याचा मुंबईसारखा विचका झाल्याशिवाय राहणार नाही,’ याची पुनरोक्ती ठाकरे यांनी केली. ‘पुण्याची दुर्दशा व्हायचे थांबवायचे असेल, तर आधी बांधकामे (Pune) थांबवा, असे ते म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.