Chinchwad : आयटीनगरी हिंजवडीत गेल्यावर अमेरिकेला आल्यासारखे वाटते – शरद पवार

एमपीसी न्यूज – हिंजवडीला साखर कारखान्याऐवजी आयटी पार्क (Chinchwad) आणले. एक लाख लोक तिथे आज काम करत आहेत. वर्षाला 11 हजार कोटींची निर्यात होते. आज हिंजवडीत गेल्यावर इंग्लंड, अमेरिकेत आल्याचा प्रत्यत येतो. औद्योगिक, शिक्षणनगरी नंतर आता पिंपरी-चिंचवड आयटी हब झाली आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

Today’s Horoscope 22 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

चिंचवड येथील श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, श्रीनिवास पाटील, माजी महापौर आझम पानसरे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, हिंजवडीला साखर कारखाना काढायचा होता. मी कारखान्याचे भूमीपूजन केले आणि भाषणात सांगितले येथे कारखाना होणार नाही. हिंजवडीऐवजी दुसरी जागा दिली. हिंजवडीत माहिती व तंत्रज्ञाननगरी काढली. आज हिंजवडीत गेल्यावर इंग्लंड, अमेरिकेत आल्याचा प्रत्यत येतो. एक लाख लोक तिथे काम करत आहेत.

एकेकाळी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी होते. टेल्को, बजाज कंपन्या अतिशय उत्तमपणे काम करत होत्या. आता औद्योगिक, शैक्षणिकनंतर माहिती व तंत्रज्ञाननगरी झाला आहे. जगात या भागाचे नाव घेतले जाते. या नगरीतून दरवर्षी 11 हजार कोटींची निर्यात या भागातून होत असते. याचा पाया शैक्षणिक संस्थांनी घातला आहे. त्यामुळे (Chinchwad) शहराचा चेहरा बदलत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.