Today’s Horoscope 22 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

22.10.2023.

शुभाशुभ विचार- 09.00 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास.

राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तराशाढा 18.44 पर्यंत नंतर श्रवण.

चंद्र राशी – मकर.

————————————

मेष ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यासंच प्राधान्य देणे गरजेचे आहे. अति व्यस्त दिवस.

वृषभ (शुभ रंग- केशरी)

आज सज्जनांच्या सहवासात तुमची चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळा. आज जरा संयम बाळगा.

कर्क (शुभ रंग- मरून )

कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

सिंह (शुभ रंग- लाल)

क्षूल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येऊ शकतात. ध्येय प्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल.

कन्या ( शुभ रंग- हिरवा )

कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी)

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासाला निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील. वाणित मात्र गोडवा असणे गरजेचे आहे.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

धनु (शुभ रंग- पिस्ता )

आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणित मृदुता ठेवली तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र खूपच दगदग होईल.

मकर ( शुभ रंग- मरून)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. उपवर तरुण-तरुणींना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक तुमच्यापुढे नमते घेतील.

कुंभ (शुभ रंग – क्रीम )

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दूरचे प्रवास घडतील. प्रवासात सावध रहा.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही आपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आजचा दिवस सत्कारणी लावा आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.