Baramati : नाव काय रे तिचे म्हणत अजित पवारांनी काढली गौतमी पाटीलची आठवण

एमपीसी न्यूज- विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी परिचित (Baramati)  आहे. कुठलीही आढेवेढे न घेता मनात आहे ते बोलून अजितदादा मोकळे होतात. बोलण्यात आणि भाषणात त्यांचा हात सहसा कोणी पकडू शकत नाही. भाषणाच्या ओघात ते टोमणा मारून मोकळे होतील आणि समोर बसणाऱ्यांना कळणारही नाही अशी त्यांची शैली आहे, याच अजितदादांनी बारामतीत बोलत असताना प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची आठवण काढली.
अजित पवार मंगळवारी बारामती कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करत होते. मध्येच लग्न आणि यात्रेचा संदर्भ आला. “त्यादिवशी लग्नाची तारीख आहे की नाही हे मला माहित नाही, यात्रा असेल तर रात्री रात्री कापाकापीच… रात्री तमाशा… मग यात्रेला पाटील बाईला बोलवायचं का” असं अजित पवारांनी म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

Pune – Mumbai Express Way : पुणे मुंबई दृतगती मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू

खरंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अश्लील नृत्यावरून गौतमी पाटीलची कानउघडणी केली होती. लावणी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे ती टिकवली पाहिजे. चुकीचे वर्तन करणाऱ्यांना लगाम घातला पाहिजे असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर गौतमीने अजित दादांची जाहीर माफी मागितली होती. पुन्हा अश्लील कृत्य करणार नाही अशी तिने हमी दिली होती. त्यानंतर आता खुद्द अजित पवारांनी भर सभेत गौतमी पाटीलची आठवण काढल्याने अनेकांच्या भुवया (Baramati)   उंचावल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.