Pune – Mumbai Express Way : पुणे मुंबई दृतगती मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या (Pune – Mumbai Express Way) वाढल्याने वाहतूक कासवगतीने सुरू आहे. सकाळच्या वेळी मुंबईहून पुण्याला येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक मंदावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 26) सकाळी मुंबईहून पुण्याला येणाऱ्या दिशेने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. विशेषत: बोरघाटात वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

 

MPC News Podcast 26 April 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

सकाळच्या वेळी मुंबईहून पुण्याकडे कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे देखील ही वाहतूक मंदावली आहे. दरम्यान अनेक प्रवाशांनी पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावर एखादा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली. मात्र अशी कोणतीही अपघाताची घटना नसून केवळ वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.