Alandi : इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने भक्ती सोपान पूल रहदारीस बंद

एमपीसी न्यूज – मावळ भागात व धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने आळंदी (Alandi) येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने भक्ती सोपान पूल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

Kothrud : चंद्रकांत पाटील यांच्याकडून दोन्ही जिगरबाज पोलिसांचे अभिनंदन

तर सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण पणे भरून त्यावरून पाणी नदीपात्रात पडत आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने सिध्दबेट जवळील बंधाऱ्या मधील नदीपात्रातील जलपर्णी बोट व कर्मचाऱ्यां मार्फत काढण्याचे कार्य सुरू आहे. गरुड स्तंभ पुलाजवळील बंधाऱ्यातील (इंद्रायणी नगर बाजू कडील) जलपर्णी  पोकलँडच्या सहाय्याने काढण्याचे कार्य सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.