One act play : मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ एकांकिकेस भरत करंडक

एमपीसी न्यूज : भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भरत करंडक एकांकिका स्पर्धेत मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारली असून महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ या एकांकिकेने सांघिक प्रथम पारितोषिक मिळवत (One act play) भरत करंडकावर आपले नाव कोरले. कलादर्शन, पुणेच्या ‘यशोदा’ एकांकिकेस द्वितीय तर रेवन एंटरटेन्मेंटच्या ‘असा ही एक कलावंत’ या एकांकिकेस तृतीय पारितोषिक देण्यात आले. विजेत्या संघांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार आणि तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे भरत करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे 13वे वर्ष आहे. स्पर्धेत 25 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्या संघांची आज (दि. 4 ऑक्टोबर) घोषणा करण्यात आली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते स्वरूप कुमार, कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसत्ताचे सहसंपादक मुकुंद संगोराम, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे, प्रदिप रत्नपारखी, प्रतिभा दाते, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्यवाह आणि स्पर्धेचे परिक्षक संजय डोळे, अश्विनी अंबिके, चंद्रशेखर भागवत यांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली. नेपथ्याचे पारितोषिक विठ्ठल हुलावळे यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी बोलताना मुकुंद संगोराम म्हणाले, नाटक म्हणजे प्रयोगशरण कला आहे, ती गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे. नाटक ही कलेची झींग आहे. मनाने कलाकार असणे ही संपन्न करणारी गोष्ट आहे. (One act play) स्पर्धा आपापसातच आहे. संपूर्ण भारतात नाटक नावाची जीवंत वस्तू फक्त पुण्यातच जीवंत आहे. नाटकाने नाक, कान, मेंदू जीवंत राहतात आणि चांगले वाईट समजण्याची जाण येते.

New Roop Laxmi Jewellers : दसरा-दिवाळीची सुवर्ण खरेदी फक्त ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’मध्येच! नाममात्र मजुरी शिवाय लाखोंची बक्षिसे!

भरत नाट्य मंदिर हे आवडते नाट्यगृह आहे, असे सांगून स्वरूपकुमार म्हणाले, या नाट्यगृहात प्रेक्षक आणि कलाकारामध्ये सर्वात जास्त देवाण घेवाण होते. परिक्षकांच्या वतीने अश्विनी अंबिके यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. (One act play) सुरुवातीस भाग्यश्री कुलकर्णी आणि सतीश सकिनाल यांनी कथक नृत्यप्रस्तुती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग मुखडे यांनी केले तर सूत्रसंचालन चारुलता पाटणकर, अपर्णा पेंडसे, राजेंद्र उत्तुरकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय रवींद्र खरे, संजय डोळे यांनी केला. आभार अभय जबडे यांनी मानले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल (एकांकिका आणि संघाचे नाव या क्रमाने)
सांघिक प्रथम : गाभारा, मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयसांघिक द्वितीय : यशोदा, कलादर्शन, पुणे
सांघिक तृतीय : असा ही एक कलावंत, रेवन एंटरटेन्मेंट
सांघिक उत्तेजनार्थ : चाराणे, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय
सांघिक उत्तेजनार्थ : शोधयात्रा, सहज प्रॉडक्शन

वैयक्तिक पारितोषिके
लेखन प्रथम : अमेय जोग, ओम जगताप (असा ही एक कलावंत) 750 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
लेखन द्वितीय : अभिजित काणे (पापक्षालन), 500 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
लेखन उत्तेजनार्थ : आकांक्षा पवार (गाभारा), प्रशस्तीपत्र
दिग्दर्शन प्रथम : टीम (गाभारा), 750 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह, मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय
दिग्दर्शन द्वितीय : विनोद रत्ना, चंदनशिव (यशोदा), 500 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह, कलादर्शन, पुणे
दिग्दर्शन उत्तेजनार्थ : शांभवी जोशी (शोधयात्रा), प्रशस्तीपत्र, सहज प्रॉडक्शन
अभिनय : (भूमिका, एकांकिका आणि संघाचे नाव या क्रमाने) पुरुष प्रथम : अमोल बोरसे (यशोदा, यशोदा, कलादर्शन, पुणे), 750 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
पुरुष : द्वितीय : राघवेंद्र कुलकर्णी (गिरिश, असा ही एक कलावंत, रेवन एंटरटेन्मेंट), 500 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
अभिनय स्त्री : प्रथम : तन्वी कांबळे (नझमा, चाराणे, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय), 750 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
स्त्री : द्वितीय : पूर्वा देशपांडे (ती, बीज, रिक्त प्रॉडक्शन), 500 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
लक्षवेधी अभिनय : शौनक कुलकर्णी (कीर्तनबुवा, गाभारा, मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय), 500 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह

विविध पुरस्कार मिळविलेल्या पुरस्कारार्थींचा या वेळी सत्कार करण्यात आला. यात चारुलता पाटणकर (कै. अप्पासाहेब ताम्हनकर पुरस्कृत उत्कृष्ट नाट्य कलाकार), राहुल गोळे (कै. बबनराव गोखले पुरस्कृत उत्कृष्ट संगीत वादक कलाकार), अर्णव पुजारी ( कै. उदयसिंह पाटील पुरस्कृत उत्कृष्ट बालकलाकार), भाग्यश्री कुलकर्णी (कै. गोपाळराव लिमये पुरस्कृत संस्था कलाकार), अनुष्का आपटे (भरत नाट्य मंदिर, गुणवंत संस्था कलाकार), संजय डोळे (विनोदमूर्ती अवधूत घाटे स्मरणार्थ चारुलता पाटणकर पुरस्कृत उत्कृष्ट नाट्यसेवा पुरस्कार) यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.