Pune Womens Navratri : पुणे महिला नवरात्रोत्सवात हजारो महिलांची महाआरती संपन्न

एमपीसी न्यूज : पुणे नवरात्रौ महिला महोत्सव अंतर्गत शिवदर्शन येथील श्रीलक्ष्मीमाता मंदिरात सोमवार सायं. हजारो महिलांनी देवीची महाआरती केली.(Pune Womens Navratri) याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल, प्रवीण मसाले उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडिया, सौ. श्वेता चोरडिया, सिनेअभिनेत्री श्वेता शिंदे यांनी देवीची पूजा केली. हजारहून अधिक महिलांनी केलेल्या या महाआरतीवेळी श्रीलक्ष्मीमाता मंदिरही आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने खुलून दिसत होते.

याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत करून म्हंटले की, ‘या महाआरतीस हजारो महिला सहभागी झाले ही आनंदाची बाब आहे. यातून नारीशक्तीचे विराट दर्शन होत आहे.  अशा महाआरती उपक्रमातून संस्कार अधिक रुजण्यास मदत होते असे ते म्हणाले.

पुणे नवरात्रौ महिला  महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल म्हणाले की, ‘या वर्षी महिलांच्या विविध स्पर्धांमध्ये हजारो महिला सहभागी झाल्या यातून नवरात्रौतील (Pune Womens Navratri) अशा महिला महोत्सवाची गरज किती मोठी होती हे लक्षात येते.’ पुढील वर्षी अधिक स्पर्धा घेण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला.

One act play : मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ एकांकिकेस भरत करंडक

या नंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. तसेच लकी ड्रॉ देखील काढण्यात आला. यामध्ये पहिले बक्षीस वाशिंग मशीन, दुसरे बक्षीस ओव्हन, तिसरे बक्षीस मिक्सर आणि 20 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.(Pune Womens Navratri) या मांगल्याने भरलेल्या या महाआरती कार्यक्रमानंतर पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता झाली.

हा कार्यक्रम यशवी होण्यासाठी शारदा माने, छाया कातुरे, निर्मला जगताप, नुपूर बागुल, विद्युलता साळी, रेखा झानपुरे, योगिता निकम व विजया बागुल यांचे विशेष सहाय्य लाभले. नम्रता जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.