Maval : सांगिसे पाणीपुरवठा योजनेच्या सुमारे दोन कोटींच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सांगिसे येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 1 कोटी 92 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.(Maval) यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा केला. या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दि. 28) महिलांच्या हस्ते संपन्न झाला. सांगिसे येथे पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व बुधवडी येथे 10 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, सुमारे ११ किलोमीटरची पाईपलाईन व फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, सरपंच बबन टाकळकर,उपसरपंच संगीता टाकळकर, सदस्य विष्णू जाधव, ज्ञानेश्वर भांगरे,विलास मानकर, शोभा गरुड,चंदाताई पिंगळे, श्रद्धा दळवी, कल्पेश मराठे, किरण ठाकर, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Kasba-Bye-Election : पोस्टल मतमोजणीचा पहिला कल हाती, रवींद्र धंगेकर आघाडीवर

सांगिसे येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने सुमारे 1 कोटी 92 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या योजनेचा भूमिपूजन समारंभ मंगळवार (दि.28) महिला भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. जल जीवन मिशन अंतर्गत सांगिसे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 92 लक्ष निधी उपलब्ध झाला असून या अंतर्गत सांगिसे येथे पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व बुधवडी येथे दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार असून सुमारे अकरा किलोमीटरची पाईपलाईन करण्यात येणार आहे व फिल्टर प्लांट ही उभारण्यात येणार आहे.त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध  पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सांगिसे,बुधवडी येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नव्हते. या समस्येची दखल घेत आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करुन ही नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली.(Maval) भूमिपूजना नंतर कामाचा देखील शुभारंभ करण्यात आला असल्याने ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.