Kasba-Bye-Election : भाजपच्या बालेकिल्ल्यात काॅंग्रेसचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज : कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. 28 वर्षानंतर भाजपचा कसब्यात पराभव झाला आहे.

भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. ‘काटे की टक्कर’ अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी 11040 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. पाचव्या फेरीनंतर हेमंत रासने रवींद्र धंगेकर यांच्याशी चुरस करताना दिसून आले मात्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली आणि दणदणीत विजय मिळवला

20 व्या फेरीअंती काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना 72, 599 मत मिळाली. तर भाजपच्या हेमंत रासने यांना 61, 771 मत मिळाली. रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर पुण्यात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जनतेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस पहायला मिळाल्याची प्रतिक्रीया त्यांनी विजया नंतर दिली.

Supreme Court’s order : मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

पराभवानंतर हेमंत रासने यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार म्हणून मी कमी पडलो. यामागची कारणे शोधणार आहे. पक्षाने मला संधी दिली, पण मीच कुठेतरी कमी पडलो. हा पराभव मला मान्य आहे, असे रासने यांनी सांगितले.

कसबा पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतली होती. ती आघाडी कायम ठेवली. विशेष म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या भागांतील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरही धंगेकर हे आघाडीवर राहिले. अखेर धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला. तब्बल ११०४० मताधिक्याने धंगेकरांनी हा विजय मिळवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.